Dehu News : देहूत उद्या ’संकल्प वसुंधरेच्या संवर्धनाचा’ अंतर्गत वृक्षारोपण
Pckhabar- जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 336 व्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त ’आम्ही देहूकर’ सामाजिक संस्था आणि देहू राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने ’संकल्प वसुंधरेच्या संवर्धनाचा’ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्या (रविवार) आयोजन करण्यात आले आहे.
देहूतील जुना पालखी मार्ग, रंगनाथ इस्टेट शिवारालगत सकाळी 9 वाजता 336 वृक्षांचे रोपण मावळचे आमदार सुनिल शेळके आणि त्यांच्या पत्नी सारिकाताई शेळके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी तहसीलदार तथा देहू नगरपंचायतचे प्रशासक मधूसुदन बर्गे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाप्पुसाहेब भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ञ डॉ. किशोर यादव, अभिमन्यु काळोखे, कृष्णा परंडवाल, अॅड. सुरेश खुर्पे, विठ्ठलराव काळोखे, प्रितम वारघडे, मधुकर कंद, प्रकाश टिळेकर, बाळासाहेब आप्पा काळोखे, रामदास काळोखे, शेखर परंडवाल, हेमलता काळोखे, अशोक मोरे, कांतीलाल काळोखे, अॅड. भोलेनाथ काळोखे, बाप्पुसाहेब काळोखे, रत्नमाला करंडे, सुनिता टिळेकर, पुनम काळोखे, राणी मुसुडगे, देहू राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश हगवणे, कामगार सेलचे उपाध्यक्ष योगेश जाधव, युवकचे अध्यक्ष योगेश मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख विशाल परदेशी यांनी दिली.










Leave a Reply