लोणावळा शहरात मुसळधार पाऊस
Pckhabar- पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात मागील अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे सोमवारी जोरदार पुनरागमन झाले असून मंगळवारी सकाळ पासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत २४ तासात शहरात ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
मागील वर्षाच्या तुलनेत लोणावळा शहरात यंदाच्या वर्षीचे पावसाचे प्रमाण आतापर्यंत तिप्पटीने मागे आहे. यंदा जून व जुलै या दोन्ही महिन्यात लोणावळा शहरात केवळ १५१० मिमी पाऊस झाला होता. मागील वर्षी सोमवार अखेरपर्यत लोणावळ्यात ४१४७ मिमी पाऊस झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फार कमी पाऊस झाल्याने नागरिक चिंतातूर झाले होते. धरणातील पाणीसाठा वाढत नसल्याने सर्वांना भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावत होती. त्यातच सोमवार रात्रीपासून जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.










Leave a Reply