Pimpri News : जनवादी महिला संघटनेतर्फे गरजूंना धान्य वाटप

Pimpri News : जनवादी महिला संघटनेतर्फे गरजूंना धान्य वाटप


Pckhabar-अ. भा. जनवादी महिला संघटनेच्या वतीने शहरातील घर कामगार, विधवा, परितकत्या, अपंग, रिक्षाचालक आदी 4 हजाराहून जास्त गरजू कुटुंबाना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.

अ. भा. जनवादी महिला संघटनेच्या वतीने 2020 पासून धान्य बँक सुरू केली. आपत्कालीन काळात सामान्य आणि गोरगरीब कुटुंबाचे पोटापाण्याचे हाल होऊ नयेत. यासाठी संघटनेची टीम घरोघरी धान्य गोळा करते.

2020 साली कोरोनाच्या लाटेमध्ये शहरातील घर कामगार, विधवा, परितकत्या, अपंग, रिक्षाचालक आदी 4 हजाराहून जास्त गरजू कुटुंबाना जीवनावश्यक किट वाटले होते.

कोरोनाच्या यावर्षीच्या लॉकडाऊन मध्ये 345 कुटुंबाना तांदूळ, गव्हाचे वाटप करण्यात आले. अपर्णा दराडे, शैलजा कडुलकर, गौरी साकुरे, सोनाली मन्हास, गुलनाज शेख, सुषमा इंगोले, शेहनाज शेख, योगिता कांबळे,यांनी हा उपक्रम सुरू केला. एप्रिल, मे या दोन महिन्यात हरगुडे वस्ती, जाधववाडी,पिंपळे सौदागर, आकुर्डी, बिजलीनगर इ परिसरातील गरजूना धान्य वितरित करण्यात आले. शहरातील संवेदनशील मध्यमवर्गीय कुटुंबांनी तसेच विविध सोसायट्या मधील कुटुंबांनी धान्य दान करून या कार्याला मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *