Talegaon Crime News : महामार्गावर कार चालकाला तृतीयपंथीयांनी मारहाण करत लुटले
Pckhabar- तळेगाव दाभाडे कडून भोसरीकडे जात असलेल्या एका कार चालकाला तीन तृतीयपंथीयांनी अडवून मारहाण करून 35 हजारांचा ऐवज लुटले. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर एमरोल्ड हॉटेलच्या समोरील खिंडीत घडली.
बालिका आबादास भोगे (वय 33), दिया बाबुराव शर्मा (वय 27), राहुल कैलास गायकवाड (वय 22, सर्व रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या तृतीय पंथीयांची नावे आहेत. याबाबत रुबेन विल्यम ओहोळ (वय 45, रा. मस्करनेस काॅलनी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी ओहोळ त्यांच्या कार मधून (एम एच 47 / वाय 2147) तळेगाव दाभाडेकडून जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरून भोसरीकडे जात होते. ते एमरोल्ड हॉटेलच्या समोरील खिंडीत आले असता आरोपी तीन तृतीयपंथीयांनी त्यांची कार अडवली.
त्यानंतर फिर्यादी यांना हाताने मारहाण करून त्यांच्याकडील पाचशे रुपये रोख रक्कम आणि 35 हजारांचा सोन्याचा गोफ असा एकूण 35 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.










Leave a Reply