Pimpri Corona News :कोरोनाचे 224 नवे रूग्ण

Pimpri Corona News :कोरोनाचे 224 नवे रूग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या तिनशेेच्या आत आली आहे. तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे.  त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.  तर शनिवारी 224 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 233 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 51 हजार 967 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 44 हजार 809 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 16 तर हद्दीबाहेरील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका रूग्णालयात 2 हजार 7 रूग्ण उपचार घेत असून 1000 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत.

5 हजार 58 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 367 घरांना भेटी देऊन 5 हजार 628 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 130  असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 795 करण्यात आले आहेत. शहरात 5 लाख 8 हजार 580 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *