Chinchwad News: पिंपळ, चिंच, वडाच्या पाच हजार झाडांची लागवड करणार ; आमदार लक्ष्मण जगताप यांचा संकल्प

ही बातमी शेअर करा.

Chinchwad News: पिंपळ, चिंच, वडाच्या पाच हजार झाडांची लागवड करणार ; आमदार लक्ष्मण जगताप यांचा संकल्प
Pckhabar- देशात वृक्षांच्या नावाने लौकिक असलेले पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर आहे. शहराच्या  नावाप्रमाणेच पिंपळ-चिंच-आणि वड या देशी वृक्षांची पाच हजार झाडांची लागवड करण्याचा संकल्प केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संकल्प  आमदार लक्ष्मण जगताप यांनी राजमाता जिजाऊ गार्डन येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रम प्रसंगी केला.

शहरातील वृक्षांची संख्या वाढवावी व माझे पिंपरी-चिंचवड, हिरवेगार पिंपरी चिंचवड, प्रदूषण मुक्त पिंपरी-चिंचवड करण्याकरिता पर्यावरण प्रेमी , वृक्षप्रेमी, लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाने एकत्रित येऊन सहकार्याने कार्य केल्यास शहर सुंदर व हिरवेगार ठेवता येईल असे मत आमदार जगताप यांनी मांडले.

नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंगोळकर, सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे,  संजय गांधी निराधार योजना समितीचे  संजय मराठे, प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक नवीन लायगुडे, श्रीगणेश सहकारी बँकेचे संचालक  मारुती तरटे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त व उद्यान विभागाचे प्रमुख  सुभाष इंगळे,उद्यान विभागाचे अधिकारी गोसावी, स्थापत्य विभागाचे उपअभियंता  चंद्रकांत मोरे, राहुल पाटील व शिर्के आणि कंपनीचे विजय बांदल व शहरातील पर्यावरण व वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.


ही बातमी शेअर करा.