Pimpri Corona news: कोरोनाचे 265 नवे रूग्ण, 1 हजार 896 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या पाचशेच्या आत आली आहे. तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. तर शुक्रवारी 265 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 1 हजार 896 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 51 हजार 743 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 44 हजार 576 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात महापालिका हद्दीत 17 तर हद्दीबाहेरील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका रूग्णालयात 2 हजार 96 रूग्ण उपचार घेत असून 936 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत.
7 हजार 488 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 694 घरांना भेटी देऊन 6 हजार 583 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 130 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 108 करण्यात आले आहेत. शहरात 5 लाख 7 हजार 63 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.









Leave a Reply