Talegaon News : डॉ. भाऊसाहेब देसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयास दोन व्हेंन्टीलेटर्स भेट

Talegaon News : डॉ. भाऊसाहेब देसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयास दोन व्हेंन्टीलेटर्स भेट
Pckhabar-मावळ तालुक्यातील टाकवे येथील केएसपीजी आणि र्‍हाईनमेटल या कंपनीतर्फे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयास दोन व्हेंन्टीलेटर्स भेट देण्यात आले.

यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रतन महापात्रा व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाने कोवीड आणि नॉन कोवीड रुग्णांसाठी केलेल्या सेवेचे कौतुक केले. यापुढे ही कंपनी रुग्णालयास सहकार्य करील असे आश्वासनही त्यांनी दिले. कंपनी तर्फे विकसीत करण्यात आलेल्या हवा शुद्धीकरण यंत्राच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन ही करण्यात आले.

एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने कार्यकारी संचालिका डॉ.सुचित्रा कराड नागरे यांनी या व्हेंन्टीलेटर्सचा उपयोग गरजू रुग्णांसाठी होईल. त्यांनी कंपनीचे आभार मानले.

यावेळी कार्यकारी संचालक डॉ.विरेन्द्र घैसास,  प्र्राचार्य डॉ.स्वाती बेलसरे व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कामत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *