Pimpri Corona News: कोरोनाचे 421 नवे रूग्ण; 894 जणांना डिस्चार्ज
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या पाचशेच्या आत आली आहे. तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. तर गुरूवारी 421 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 894 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 51 हजार 478 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 42 हजार 680 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात महापालिका हद्दीत 18 तर हद्दीबाहेरील 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका रूग्णालयात 2 हजार 777 रूग्ण उपचार घेत असून 1 हजार 903 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत.
6 हजार 377 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 931 घरांना भेटी देऊन 5 हजार 725 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 132 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 112 करण्यात आले आहेत. शहरात 5 लाख 4 हजार 97 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.









Leave a Reply