कोरोनाचे पिंपरी-चिंचवड शहरात 748 नवे रूग्ण, 20 जणांचा मृत्यू
724 जणांना घरी सोडले
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी कोरोनाचे 748 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 23 हजारी ओलांडली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 724 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात 23 हजार 682 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात सोमवारअखेर 16 हजार 206 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 489जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी 770 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 54 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. एक हजार 239 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.










Leave a Reply