Maval News : महाविकास आघाडीकडून अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट; मावळात लाचखोरीच्या घटना
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा गंभीर आरोप
Pckhabar- मावळ तालुक्यात गेल्या दीड वर्षात लाचलुचपत विभागाने आठ शासकीय लाचखोर अधिकार्यांना रंगेहाथ पकडून कारवाई केली. या अधिकार्यांना महाविकास आघाडी सरकारने वसुलीचे टार्गेट दिल्यामुळे हे अधिकारी वसुली करत असल्याचा गंभीर आरोप, माजी राज्यमंत्री, भाजपचे नेते बाळा भेगडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
वडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भेगडे बोलत होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
भेगडे पुढे म्हणाले, ”महाविकास आघाडीने दिलेल्या टार्गेटमुळे अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. मावळातील प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये भ्रष्टाचार आणि लाच दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. नागरिकांना कामासाठी कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरिकांना कामे करून घेण्यासाठी दलालांंचा आधार घ्यावा लागत आहे”. प्रशासनावर कोणाचाच अंकुश नसल्याने काही अधिकारी संगनमताने आर्थिक उलाढाली करीत असल्याचाही सनसनाटी आरोपही भेगडे यांनी केला.










Leave a Reply