Talegaon Dabhade News : व्यावसायिक मेटाकुटीला; दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्या
Pckhabar- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. याच धर्तीवर तळेगाव दाभाडे येथेही लाॅकडाऊन शिथिल करण्याची मागणी तळेगाव दाभाडे नगरपरिषद उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे यांनी केली आहे.
याबाबत सैंदाणे यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. देशमुख यांना दिलेल्या निवेदनात सैंदाणे यांनी म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे शहरांमध्ये लागू करून शहरांमध्ये व्यापारी अस्थापना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घ्यावा. कोरोना संक्रमणामुळे कालावधीमध्ये बरेच व्यावसायिकांचे व्यवसाय, उद्योगधंदे बंद झाले आहेत. उद्योजक मेटाकुटीला आले आहेत.
व्यावसायिकांना दुकानाचे भाडे, कामगारांचा पगार देणेही अवघड झाले आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. याप्रमाणे तळेगाव दाभाडे शहरांमध्येही लाॅकडाऊन शिथिल करून व्यापारी अस्थापना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्यास
परवानगी द्यावी, अशी मागणी सैंदाणे यांनी केली आहे.










Leave a Reply