Pimpri Corona News: 372 नवे रूग्ण, लसीकरणाचा पाच लाखांचा टप्पा ओलांडला

Pimpri Corona News: 372 नवे रूग्ण, लसीकरणाचा पाच लाखांचा टप्पा ओलांडला

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या पाचशेच्या आत आली आहे. तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे.  त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.  तर बुधवारी 372 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 276 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 30 जणांचा मृत्यू झाला आहे.  तसेच शहरात लसीकरणाचा पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ही समाधानाची बाब आहे.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 51 हजार 57 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 41 हजार 786 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 19 तर हद्दीबाहेरील 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका रूग्णालयात 2 हजार 686 रूग्ण उपचार घेत असून 2 हजार 485 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत.
6 हजार 424 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 127 घरांना भेटी देऊन 6 हजार 523 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 135  असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 218 करण्यात आले आहेत. शहरात 5 लाख 927 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *