Pimpri News: शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी मी जबाबदार ॲपवर नोंदणी करावी

Pimpri News: शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी मी जबाबदार ॲपवर नोंदणी करावी

‘ही’ कागदपत्रे बंधनकारक
Pckhabar-शिक्षणासाठी परदेशी जाणारे विद्यार्थी तसेच आजारामुळे अंथरुणावर असलेले व्यक्ती व रुग्ण आणि गतिमंद व्यक्तींच्या कोव्हीड१९ रोग प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली असून या लसीकरणासाठी महापालिकेच्या मी जबाबदार अॅपवर नोंदणी सुरु झाली आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

रविवार व्यतिरिक्त आठवडयातील सर्व दिवशी ठराविक लाभार्थ्यांना त्यांच्या राहत्या प्रभागाच्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर थेट (ऑन स्पॉट वॉक इन) लसीकरणाची सुविधा उपलब्ध राहील. यामध्ये ४५ वर्षे व अधिक वयोगटातील नागरिक कोविशील्ड लसीच्या पहिल्या व दुस-या डोसचे लाभार्थी, आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी वर्गातील कोविशील्ड लसीचे दुस-या डोसचे लाभार्थी, कोव्हॅक्सीन लसीच्या दुस-या डोसचे लाभार्थी यांचा समावेश असेल. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल.  तसेच एक वर्षापेक्षा लहान बाळ असणा-या स्तनदा मातांचेदेखील लसीकरण करण्यात येणार आहे.  यासाठी बाळाचा जन्मदाखला अनिवार्य असेल.

       पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातील उच्च शिक्षण्यासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाईल.  यासाठी परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले संबंधित परदेशी विद्यापीठाच्या विदेशी व्हिसासाठी प्रवेश पुष्टीकरण आणि आय-२० किंवा डीएस-१६० फॉर्म आदी वैध पुरावे आवश्यक असतील. या लसीकरणाकरीता महानगरपालिकेच्या मी जबाबदार या अॅप वर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांचे महानगरपालिकेच्या पिंपरी येथील नवीन जिजामाता लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जाईल. मी जबाबदार या अॅप वर नोंदणी चालू राहणार असून गुरुवार ते बुधवार या कालावधीमध्ये नोंदणी केलेल्या लाभार्थींचे आठवडयामधील दर शनिवारी लसीकरण करण्यात येईल. लसीकरण कार्यक्रम रविवारी बंद राहील.

आजारामुळे अंथरुणावर असलेले व्यक्ती अथवा रुग्ण तसेच गतिमंद व्यक्तींचे त्यांच्या घरी जावून कोव्हीड१९ रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मी जबाबदार या अॅप वर नोंदणी करणे आवश्यक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *