Pimpri Corona News: कोरोनाचे 286 नवे रूग्ण, 28 जणांचा मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या तिनशेच्या आत आली आहे. तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. तर मंगळवारी 286 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 282 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 50 हजार 685 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 41 हजार 510 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात महापालिका हद्दीत 17 तर हद्दीबाहेरील 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका रूग्णालयात 2 हजार 617 रूग्ण उपचार घेत असून 2 हजार 477 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत.
3 हजार 938 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 737 घरांना भेटी देऊन 6 हजार 206 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 143 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 186 करण्यात आले आहेत. शहरात 4 लाख 99 हजार 587 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply