Chinchwad News: अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Chinchwad News: अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar-पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री सद्गुरू बाळुमामा बहुउद्देशीय संस्था, पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान, राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 74 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यासाठी अक्षय ब्लड बँक पुणे यांचे सहकार्य लाभले.

        पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर व नगरसेवक सचिन चिंचवडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष विजयसिंह मते, उद्योजक अजय दूधभाते, मनोजकुमार मारकड, श्री सद्गुरू बाळुमामा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बंडू मारकड पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान तळवडेचे अध्यक्ष गजानन वाघमोडे, राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकट वाघमोडे आदी उपस्थित होते.

        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता निर्माण झाली आहे. तसेच सध्या कोरोना लसीकरण सुरू असल्याने लस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, असे बंडू मारकड पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *