Pimpri Corona News : दिलासादायक, कोरोना रूग्ण संख्या फक्त @ 246

Pimpri Corona News : दिलासादायक, कोरोना रूग्ण संख्या फक्त @ 246
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या पुन्हा पाचशेच्या आत आली होती. तर सोमवारी तर फक्त 246 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. 326 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 50 हजार 399 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 41 हजार 228 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात महापालिका हद्दीत 18 तर हद्दीबाहेरील 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका रूग्णालयात 2 हजार 601 रूग्ण उपचार घेत असून 2 हजार 747 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत.

 5   हजार 38 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 857 घरांना भेटी देऊन 6 हजार 832 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 154  असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 186 करण्यात आले आहेत. शहरात 4 लाख 97 हजार 622 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *