Pimpri News: निर्बंध शिथिल! 1 जूनपासून काय सुरू, काय बंद

Pimpri News: निर्बंध शिथिल! 1 जूनपासून काय सुरू, काय बंद

Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने अत्यावश्यक सेवेसह शहरातील सर्व दुकाने उद्या (मंगळवार) पासून सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर, पीएमपीएमल बस, हॉटेल, उद्याने बंदच राहणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केले आहेत.

हे राहणार सुरू!

# अत्यावश्यक सेवामधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजपेर्यंत सुरू राहातील.
# मनपा क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहातील.
# अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजपेर्यंत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट व बार हे केवळ पार्सल व घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.
# ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मूभा राहील.
# दुपारी 3 वाजेनंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध राहील.
# सर्व शासकीय कार्यालये 25 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहातील.
#मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजपेर्यंत सुरू राहातील.

दरम्यान, राज्य शासनाने ज्या शहरांचा रुग्वाढीचा दर हा 10 टक्यांपेक्षा कमी असेल अशा ठिकाणी महापालिकांची स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून घोषणा करण्यात आली आहे. पिंपरी महापालिकेचा रुग्णवाढीचा दर 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने पावले उचलली असून निर्बंधांसंदर्भात स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *