Pimpri News: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यश्लोक प्रतिष्ठानतर्फे अभिवादन

Pimpri News: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यश्लोक प्रतिष्ठानतर्फे अभिवादन
Pckhabar- पुण्यश्लोक प्रतिष्ठान तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोरवाडीतील त्यांच्या पुतळ्यास अध्यक्ष विलास महानवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सागर कोपनर, भाऊ उघडे, नरसिंग माने, बापू धोंडे, सागर तरंगे, सागर पालवे, अनिल सरक, अशोक उकले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुण्यश्लोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास महानवर म्हणाले” अहिल्याबाई होळकर यांनी कधीही राजा व प्रजा यांच्यात अंतर वाढू दिले नाही. जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या त्वरित सोडविण्याला त्यांचे प्राधान्य होते. जगातील कर्तुत्ववान स्त्रीयांपैकी अहिल्याबाई होत्या. अहिल्याबाई होळकर यांचे कार्य महान होते. त्यांच्या विचाराची देशाला आज गरज आहे. त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकृत केले पाहिजे, असेही महानवर म्हणाले”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *