Dehu News : इंद्रायणी घाट परिसर स्वच्छ करण्याचा ‘आम्ही देहूकर, देहू ट्रेकर्स’ च्या सभासदांचा संकल्प

Dehu News : इंद्रायणी घाट परिसर स्वच्छ करण्याचा ‘आम्ही देहूकर, देहू ट्रेकर्स’ च्या सभासदांचा संकल्प

Pckhabar- देहूगाव येथील ‘आम्ही देहूकर’ या सामाजिक संघटनेच्या वतीने देहूच्या पवित्र अशा इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. रविवारी सकाळी इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करून या स्वछता संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. आम्ही देहूकर, देहू ट्रेकर्स यांच्या ५० ते ६० कार्यकर्त्यानी इंद्रायणीचा घाट तसेच स्मशानभूमी असलेल्या घाटाचा परिसर स्वच्छ केला.

देहूगाव विकास आराखड्या अंतर्गत देहूगाव येथील पवित्र इंद्रायणीच्या तीरावर आकर्षक असा घाट बांधण्यात आला आहे. हा घाट अतिशय सुंदर आणि तितकाच मनमोहक असा आहे. या घाटावर ठिकठिकानी झाडे लावण्यात आली असून त्या ठिकाणी बसण्यासाठी पार देखील करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक भाविक भक्त या ठिकाणी वृक्षाच्या सावलीत पारावर विसावतात. भोजन करतात. परंतु केरकचरा हा कचरा कुंडीत न टाकता घाटावर तसाच ठेवतात. तर देहूगाव इंद्रायणी नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीत पंचक्रोशीतील मृत्यू व्यक्तीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात येतात. परंतु अंत्यविधी झाल्यानंतर किंव्हा दशक्रियाविधी झाल्यावर जे निर्माल्य तयार होते. ते तसेच जागेवर ठेवले जाते. किंवा इंद्रायणी नदीच्या पाण्यात टाकले जाते. त्यामुळे पाण्यात देखील कचरा तरंगत असतो. परिणामी इंद्रायणी घाटाला विद्रुप स्वरूप निर्माण होते. मन प्रसन्न होण्याऐवजी हे पाहून सुन्न होत. त्यासाठी आता या पवित्र आशा इंद्रायणी घाटाची दर महिन्याला स्वछता करण्याचा प्रकप आम्ही देहूकर संघनेच्या कार्यकर्त्यानी सुरू केला असल्याचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस कामगार सेलचे उपाध्यक्ष योगेश जाधव यांनी सांगितले.

इंद्रायणीच्या घाटावर कायम स्वछता राहावी यासाठी एक आदर्श नियमावली तयार करून तसे फलक इंद्रायणी नदीच्या घाटावर ठिकठिकानी लावण्यात येणार आहेत. अंत्यविधी किंव्हा दशक्रिया विधी  झाल्यावर निर्माण होणारे निर्माल्य हे इंद्रायणी नदीच्या पात्रात , किंव्हा घाटावर न टाकता .ते कचरा कुंडीत टाकावे

कोणीही कसलाही कचरा करू नये ,आणि केलाच तर तो कचरा कुंडीत टाकावा

दशक्रिया विधी करणार्यांनी काही रक्कम दान करावी. जेणे करून त्या दान केलेल्या रक्कमेतून घाट स्वच्छ करण्यासाठी खर्च करता येईल.

 जे काही नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.  अशा प्रकारची एक आदर्श नियमावली स्थानिक देहूनगर पंचायत , तहसीलदार ,आणि पुणे जिल्हा अधिकारी यांच्या मान्यतेनुसार करण्यात येईल , असे देहूगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी या स्वछतेच्या मोहीमे प्रसंगी सांगितले.

रविवारी आयोजित केलेल्या इंद्रायणी घाट स्वछता मोहिमेत , रामचंद्र आय्यर ,शैलेश चव्हाण , माणिक जाधव ,बाप्पु मुसुडगे, संदीप गार्डे ,सचिन पवार, रुपेश मोलवदे ,दीपक पाटील, राहुल साळुंखे , प्रशांत बेंडभर, अमोल सोनवणे ,विजय फिरके , विजय सुतार, सुजित थोरात, दत्ता गुरव आदी पन्नास ते साठ कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *