Pimpri news: घर घेत का कुणी घर, कोरोनामुळे भाडेकरू मिळेना; घरमालक झाले हैराण
Pckhabar- देशामध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत चालल्याने सुमारे दिड वर्षापासून शासनाकडून टाळेबंदी व अनेक निर्बंध लावण्यात आले. यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग धंदे बंद पडले. परिणामी अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. अनेकांना शहर सोडून गावचा रस्ता धरला. यामुळे लाखो रुपये गुंतवून घर उभ केलेल्या घरमालकांना भाडेकरु मिळत नसल्याने हैराण झाले असून कर्जबाजारी झाले आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात बॅंकांचे कर्ज काढून अनेकांनी मोठी घर बांधली. बांधलेल्या घराच्या माध्यमातून भाडेकरूच्या माध्यमातून भाडे मिळेल या अपेक्षेने अनेकांनी आपल्या बजेटनुसार गुंतवणूक केली. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे भाडेकरू काम-धंदा व नोकरी गेल्याने आपल्या गावाकडे स्थायिक झालेत. यामुळे बॅंक लोन आणि खासगी कर्ज घेऊन घर बांधलेले घर मालक मात्र, चिंतेत पडले. घर बांधण्यासाठी काढलेलं लोणचा हप्ता कसा भरायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योग नगरी म्हणून ओळखले जाते. शहरांमध्ये राज्यातील विविध भागातून व देशभरातून अनेक कामगार नोकरी-धंद्यासाठी शहरांमध्ये येतात. आणि भाड्याने घर घेवून राहतात. मात्र, कोरोनामुळे बहुतांश कामगारांनी नोकरी गेल्याने किंवा वर्क फॉर्म होम मिळाल्याने गड्या आपला गावच बरा म्हणत गावाची वाट धरली. पिंपरी-चिंचवड शहरात घर भाड्याने देवून त्यावरच उदर्निर्वाह करणारांची संख्या मोठी आहे. दिडवर्षापासून भाडेकरु मिळत नसलेल्या घरलकांचे हाल होत आहे.
पिंपरी-चिंचवड पुणे शहरामध्ये एक गुंठा जागा विकत घ्यायची झाल्यास किमान 25 ते 30 लाख रुपये मोजावे लागतात इतकी मोठी रक्कम गुंतवून अनेकांनी मोठी घरे बांधली. या घरांमध्ये भाडेकरू ठेवून त्यांच्या माध्यमातून आपण काढलेले कर्ज फेडू अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक नागरिकांनी पुणे व पिंपरी-चिंचवड शहर सोडून गावी गेले आहे. यामुळे घरमालकांना संपूर्ण घराचे मेंटेनन्स व लाईट बिल स्वतः खर्च करावे लागत आहे. आता परिस्थिती कधी सुधारेल आणि भाडेकरू कधी शहरांमध्ये दाखल होतील याची वाट शहरातील घर मालक बघत आहेत.
भाडे झाले कमी
– कोरोना महामारी येण्याअगोदर भाड्याने घेण्यासाठी एरीया नुसार रुम किचन घरासाठी 5 ते 7 हजार, वन बीएचके फ्लॅट 8 ते 15 तर, टूबीएचकेसाठी 12 ते 20 हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता भाडे कमी झाले असून भाड्यामध्ये पाच ते सहा हजार रुपये कमी झाले आहे.










Leave a Reply