Pimpri News: शहरातील 40 रूग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये आढळल्या गंभीर त्रुटी
Pckhabar- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेत वाढ होत आहे. यामुळे विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील व कॅन्टोन्मेंटची मिळून 143 रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले. यामध्ये 40 रुग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये त्रुटी आढळून आली असून ह्या त्रुटी दूर करण्यासाठी अग्निशामन विभागाकडून तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील 737 खाजगी व शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले यामध्ये 91 रुग्णालयामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील 133 खाजगी रुग्णालये व कॅन्टोन्मेंटचे 11 रुग्णालय असे मिळून 143 रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात सादर करण्यात आले. यामध्ये 40 रुग्णालयाच्या फायर ऑडीट मध्ये त्रुटी आढळून आल्या आहे. या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी अग्निशामक विभागाकडून तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील 13 रूग्णालयाच्या फायर ऑडिट मध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्या आहेत . तर , उर्वरित रुग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये सामान्य व मध्यम स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. तीन आठवड्यामध्ये ह्या त्रुटी दुरुस्त करून पुन्हा सादर करण्याच्या सूचना रुग्णालयांना करण्यात आले आहेत. कोरोना काळात वारंवार घडत असलेल्या दुर्घटनेमुळे फायर ऑडिटला प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून यामध्ये कुठलीही दिरंगाई सहन केली जाणार नाही असे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
त्रुटी आढळून आलेल्या रुग्णालयांना अग्निशामक विभागाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे साधारण 21 दिवसांमध्ये त्यांनी त्रुटी संदर्भात नव्याने ऑडिट सादर करायचे आहे. किरण गावडे, मुख्य अग्निशमन विभाग अधिकारी, पिंपरी-चिंचवड










Leave a Reply