Pimpri Corona News : कोरोना रूग्ण संख्या पाचशेच्या आत

Pimpri Corona News : कोरोना रूग्ण संख्या पाचशेच्या आत
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या पुन्हा पाचशेच्या आत आली आहे. तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे.  त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.  तर शनिवारी 458 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 314 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 49 हजार 734 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 40 हजार 360 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 18 तर हद्दीबाहेरील 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका रूग्णालयात 2 हजार 601 रूग्ण उपचार घेत असून 2 हजार 747 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत.
5   हजार 738 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 688 घरांना भेटी देऊन 6 हजार 620 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

शहरात मेजर कन्टेंन्मेंट 163  असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 179 करण्यात आले आहेत. शहरात 4 लाख 92 हजार 942 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *