’मंदीत उद्योग टिकविणे गरजेचे’
Pckhabar- जागतिक मंदीचे वातावरण असताना अनेक उद्योग नामशेष होत चालले आहेत. उद्योगांच्या समस्या दूर करणे आणि ते उद्योग टिकवणे सध्याच्या काळात गरजेचे असल्याचे मत फोरम स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केले.
भोर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात एमआयडीसी क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने उद्योग आहेत. या उद्योगांना लागणारा पुरवठा निर्मिती करणारे अनेक छोटे मोठे उद्योग शहरांमध्ये आहेत. शहरांमध्ये एमआयडीसी महामंडळाकडे जागेच्या कमतरतेमुळे सर्वांना जागा उपलब्ध होऊ शकत नाही. ज्या मोठ्या संख्येने इंडस्ट्रीज एमआयडीसीमध्ये आहेत त्यांना पूरक मालाची सुद्धा पुरवठा करणारी साखळी ही पाहिजे तरच या उद्योगांना साहाय्य होईल. यासाठी महापालिकेने स्वतःच्या कार्यक्षेत्रात या लघुउद्योगांसाठी गाळा प्रकल्प निर्माण केल्यास छोटे मोठे व्यवसाय या जागेत उभे करू शकतील. अनेक मध्यमवर्गीय लघुउद्योगांना शहराबाहेर जाऊन आपली उत्पादन निर्मिती करणे भांडवला अभावी अशक्य होत आहे. त्यामुळे शहरांमध्ये शासनाने आपल्या जागांवर उद्योगांसाठी संकुल उभारल्यास निश्चित उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण औद्योगिकनगरीत तयार होईल. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये छोटेमोठे उद्योग करणा़र्या उद्योगांना शास्तीकर लावला जातो. आधीच उद्योगांना कामे नाहीत, मंदीचे वातावरण मोठ्या संख्येने आहे. त्यावर शास्ती कर लादला आहे. त्यामुळे उद्योग नामशेष होण्यास वेळ लागणार नाही, असे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी म्हटले आहे.

Post Views: 78

Leave a Reply