Pimpri Corona news: कोरोनाचे 520 नवे रूग्ण, 31 जणांचा मृत्यू

Pimpri Corona news: कोरोनाचे 520 नवे रूग्ण, 31 जणांचा मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या पुन्हा पाचशे-सहाशेच्या आत आली आहे. तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.  तर शुक्रवारी 520 नवे रूग्ण आढळून आले असून 175 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 31 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 49 हजार 276 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 40 हजार 46 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका रूग्णालयात 2 हजार 979 रूग्ण उपचार घेत असून 2 हजार 243 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत.

शहरात महापालिका हद्दीत 19 तर हद्दीबाहेरील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 5  हजार 939 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 552 घरांना भेटी देऊन 9 हजार 128 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

शहरात मेजर कन्टेंन्मेंट 183  असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 199 करण्यात आले आहेत. शहरात 4 लाख 89 हजार 556 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *