Pune News : राज्यातील शासकीय रुग्णालयांसाठी ४४२ रुग्णवाहिकांचे वाटप

Pune News : राज्यातील शासकीय रुग्णालयांसाठी ४४२ रुग्णवाहिकांचे वाटप
Pckhabar- राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी यावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राज्यातील शासकीय रुग्णालयांना ४४२ रुग्णवाहिकांचे वाटप आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपसंचालक, आरोग्य सेवा डॉ. मिलींद मोरे, उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ, पुणे डॉ. संजोग कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आणि आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री श्री. पवार यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार निधी मिळाला होता. त्या निधीतून घेतलेल्या ४४२ नवीन रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात आले. त्यापैकी पुणे विभागातील पुणे जिल्हयासाठी १२, सातारा १३, सोलापूर ९, कोल्हापूर १७ आणि सांगली ९ रुग्णवाहिका आज वितरीत करण्यात आल्या आहेत.

*ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे*
*उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण*
टाटा कंपनीमार्फत उपलब्ध करुन दिलेल्या ३०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि ४ ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, टाटा कंपनीचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *