Hinjewadi Crime News: मोबाईलवर लिंक पाठवून बॅक खात्यातून 3 लाख केले गायब
Pckhabar-एसबीआय प्राईम के्रडीट कार्ड बंद करण्यासाठी गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर घेऊन संपर्क साधल्यानंतर कस्टमर केअर एक्झकुटीव्ह बोलत असल्याचे सांगून त्यांना मोबाईलवर लिंक पाठवून त्याव्दारे त्यांच्या बॅक खात्यातून 3 लाख रूपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार हिंजवडी येथे 24 ऑक्टोबर 2020 रोजी घडला.
मोहनलाल घिसाराम बरनेला (वय-52, रा. माण, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी 9832806632 या क्रमांकवरून फोन करणार्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एसबीआय बॅकेच्या प्राईम क्रेडीट कार्डचे स्टेटमेट पाहिजे होते. तसेच त्यांना हे कार्ड बंद करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगलवरून एसबीआय कस्टमर केअरचा नंबर घेतला. त्यानंतर त्यांना 9493512657 या क्रमाकावरून फोन आला. कस्टमर केअर एक्झकुटीव्ह बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केले. आरोपीने त्यांच्या मोबाईलवर मॅसेज पाठविला. त्यांना तीन लिंक पाठवून त्या उघडण्यास भाग पाडल्या.
तसेच त्यांना नेट बॅकिंग चालू करण्यास सांगून त्यांच्या बॅक खात्यावरून 3 लाख 4 हजार 997 रूपये काढून घेत फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply