Pune District News: जिल्ह्यात शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा सुरू राहणार 

Pune District News: जिल्ह्यात शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
Pckhabar- पुणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधांवर असलेली बंधनं काढून टाकली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज शुक्रवारी पुण्यात केली. पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने काही निर्बंध उठवण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

रेड झोनमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या पुण्यातील परिस्थिती समाधानकारक असल्याचे टोपे म्हणाले. परंतु, डेथ रेशो आणि पॉझिटीव्हीटी रेट कमी झालेला नाही. संपुर्ण महाराष्ट्रात ट्रॅकिंग आणि ट्रेसेंगी शास्त्रीय पद्धतीने वाढवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी हाय रिस्क एरिया आहे तिथेच ट्रेसिंग व्हायला हवे. उगीच कुठेही ट्रेसिंग करुन पॉझिटीव्हीटी रेट कमी आहे, असं दाखवता कामा नये.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन पंधरा दिवसांसाठी वाढवण्यात येईल. परंतु, निर्बंधांमधुन काही प्रमाणात सुट देण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाचा असेल, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *