Pimpri crime news: फ्लॅटचा मुदतीत ताबा न देता 43 लाखांचा गंडा, बिल्डरवर गुन्हा

Pimpri crime news: फ्लॅटचा मुदतीत ताबा न देता 43 लाखांचा गंडा, बिल्डरवर गुन्हा
Pckhabar- फ्लॅटसाठी कायदेशीर करारनामा करूनही त्यापोटी 43 लाख रूपये देऊनही बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकाला ठरलेल्या वेळेत ताबा न देता फसवणूक केली. हा प्रकार जुनी सांगवी येथे 2016 मध्ये घडला.

सी अ‍ॅन्ड सी निर्माण एनफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे बांधकाम व्यावसायिक  रविंद्र सुधाकर चव्हाण (रा. पार्वती बंगला, समृध्दी आंगन, धायरी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सॅम्युयल प्रकाश राव (वय-41, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी जुनी सांगवीतील आंगण उषःकाल सोसायटीमध्ये तिसर्‍या मजल्यावर टू बीएचके फ्ॅलट 25 नोव्हेंबर 2016 रोजी बुक केला होता. त्यावेळी कायदेशीर करारनामा करून 43 लाख रूपये घेतले होते. त्यानुसार फिर्यादी यांना ऑगस्ट 2017 मध्ये फ्लॅट देणे बंधनकारक होते. मात्र, सी अ‍ॅन्ड सी निर्माण एनफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे बांधकाम व्यावसायिक रविंद्र चव्हाण यांनी 27 मे 2021 अखेर फ्लॅटचा ताबा न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *