Pimpri crime news:  प्राधिकरणाची जागा विकून भाजप नगरसेवकाने लाटले 15 लाख, 80 हजार ; नगरसेवकासह दोघांना अटक

Pimpri crime news:  प्राधिकरणाची जागा विकून भाजप नगरसेवकाने लाटले
15 लाख, 80 हजार ; नगरसेवकासह दोघांना अटक
Pckhabar- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करत जागेची विक्री केल्याप्रकरणी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे भोसरीतील नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे यांच्यासह आणखी एकाला
भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.  या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राजेंद्र लांडगे हे स्थायी समितीचे माजी सदस्य, शहर सुधारणा समितीचे माजी सभापती असून सध्या ते क प्रभाग समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. लांडगे हे भोसरीचे आमदार, भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत.

राजेंद्र किसन लांडगे (वय-42, रा. भोसरी),  मनोज महेंद्र शर्मा (वय-38, रा. भगत वस्ती, हनुमान नगर, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रविकांत सुरेंद्र ठाकूर (वय-40) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एस. एस. भुजबळ (वय-37) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नगरसेवक लांडगे याने
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची इंद्रायणीनगर येथील जागा सर्हे नं. 22 मधील 936 चौ. फुट जागा शर्मा आणि ठाकूरला 15 लाख 80 हजार रूपयांना विकली.  जागेवर अतिक्रमण करून शर्मा आणि ठाकूरने 1872 चौ. फुट बांधकाम बांधले.  बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडून मिळकत कर पावती बनवून घेतली. बनावट कागदपत्रे देऊन महावितरणकडून वीज कनेक्शन घेतले.

प्राधिकरणाची जागा नगरसेवकाने विकून पैसे लाटल्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणासह भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *