Pimpri crime news: धक्कादायक! प्राधिकरणाच्या भूखंडाची विक्री; भाजप नगरसेवक भोसरी पोलिसांच्या ताब्यात
Pckhabar- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करत जागेची विक्री केल्याप्रकरणी महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण केले. जागा प्राधिकरणाच्या नावाने असताना आपली जागा असल्याचे दाखवून जागेची विक्री केल्याची तक्रार आहे. नगरसेवकाने पावर अॅप अटर्नी, ताबा पावती केल्याचे समोर आले आहे.
त्यानुसार भोसरी पोलिसांनी या नगरसेवकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. याबाबत प्राधिकरण प्रशासन तक्रार देणार असल्याचे सांगितले जात आहे.










Leave a Reply