Pimpri Corona news: कोरोना रूग्ण संख्या पुन्हा पाचशेच्या आत

Pimpri Corona news: कोरोना रूग्ण संख्या पुन्हा पाचशेच्या आत
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या पुन्हा पाचशेच्या आत आली आहे. तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे.  त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.  तर गुरूवारी 411 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 1 हजार 143 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 48 हजार 756 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 39 हजार 871 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 22 तर हद्दीबाहेरील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 6   हजार 39 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 552 घरांना भेटी देऊन 9 हजार 128 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

शहरात मेजर कन्टेंन्मेंट 183  असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 286 करण्यात आले आहेत. शहरात 4 लाख 87 हजार 183 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *