Bhosari crime news: घरफोडीत 12 तोळे सोने, दिड किलो चांदी चोरीला

Bhosari crime news: घरफोडीत 12 तोळे सोने, दिड किलो चांदी चोरीला
Pckhabar- बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटाचे लॉकर तोडून 12 तोळे सोने, दिड किलो चांदी असा तब्बल पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना इंद्रायणी नगर येथे 21 ते 26 मे या कालावधीत घडली.

डॉ. सुप्रिया विलास कुलकर्णी (वय-66, रा. समर्थ कॉलनी, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर 21 ते 26 मे या कालावधीत कुलूप लावून बंद होते. घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर तोडून 12 तोळे सोने, दिड किलो चांदी, रोकड असा 2 लाख 81 हजार 200 रूपयांचा ऐवज चोरून नेला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *