Pimpri crime news: अखेर आमदार पुत्रासह चौघांना रत्नागिरीतून केली अटक

 

Pimpri crime news: अखेर आमदार पुत्रासह चौघांना रत्नागिरीतून केली अटक
Pckhabar- कचरा संकलन करणार्‍या कंपनीच्या सुपरवायझरचे अपहरण करून लोखंडी रॉड, लाकडी दांडके, बेल्ट, चॅपरने जबरदस्त मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलासह चार जणांना पिंपरी पोलिसांनी गुरूवारी रत्नागिरीतून अटक केली आहे.

अ‍ॅन्थोनी कंपनीचे सुपरवायझर तानाजी भगवान पवार (वय- 39, रा. मोशी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सिद्धार्थ अण्णा बनसोडे याच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नऊ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, आरोपी सिध्दार्थ बनसोडेसह चार जण फरार होते. त्यामुळे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अखेर पोलिसांनी आमदार बनसोडे यांच्या मुलासह चौघांना अटक केली आहे.

याबाबत परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी माहिती दिली.
सिद्धार्थ अण्णा बनसोडे, आमदारांचा स्वीय सहाय्यक सावंत कुमार, सतिश लांडगे, रोहित पंढारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *