Pimpri Corona news: 623 नवे रूग्ण, 882 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या हजाराच्या आत आली आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. तर बुधवारी 623 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 882 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 48 हजार 345 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 38 हजार 728 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात महापालिका हद्दीत 25 तर हद्दीबाहेरील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 6 हजार 4 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 299 घरांना भेटी देऊन 8 हजार 537 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
शहरात मेजर कन्टेंन्मेंट 184 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 369 करण्यात आले आहेत. शहरात 4 लाख 84 हजार 432 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply