Hinjawadi Crime news: घरगुती गॅसचा काळा बाजार; एजन्सी मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा
Pckhabar- घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीरपणे गॅस चोरी करून कमी वजनाचे गॅस ग्राहकांना देणार्या हिंजवडी येथील एका गॅस एजन्सीमधील मॅनेजरसह पाच कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार भारत गॅस एजन्सी येथे उघडकीस आला.
सुधिर तुकाराम खैरनार (वय-47,रा. धनकवडी), ओमप्रकाश सोहनलाल बिष्णोई (वय-40), अशोक ओमप्रकाश बिष्णोई (वय-24), धनशाम सुगनाराम चिप्पा (वय-21, तिघे रा. पारखे वस्ती, वाकड), नितीन वसंत टंकसाळे (रा. काळभोर वाडा, शुक्रवार पेठ, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक आशिष ज्ञानदेव बनकर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे वस्ती येथे भारत गॅस एजन्सीचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये आरोपी बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी करत होते. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी दुपारी गॅस सिलेंडरच्या गोडाऊनवर छापा मारला. यावेळी आरोपी एका सिलेंडरमधून दुसर्या सिलेंडरमध्ये असुरक्षितपणे गॅस काढून घेत होते. गॅस काढून घेतलेले सिलेंडर हे ग्राहकांना देवून त्यांची फसवणूक करत होते.
हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.










Leave a Reply