Mahalunge News : ऑनलाईन योग शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, निरामय योग प्रसार केंद्र आणि मंथन फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने म्हाळुंगे येथे सात दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोविड काळात ऑनलाईन योगा शिबिराचे आयोजन केल्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा लाभ घेता आला. मुख्यत्वे ऑनलाईन शिबीर असल्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांना सहभागी होता आले.
शिबिरात रोग प्रतिकारशक्ति वाढवण्यास उपयुक्त विविध सूक्ष्मयोग आसानांचे, प्राणायामांचे तसेच जलनेती शुद्धीक्रियेचे कृतीयुक्त प्रशिक्षण देण्यात आले. कोणत्याही व्यक्तीला सहज करता येणाऱ्या खांघाच्या हालचाली, कंबरेच्या हालचाली, हस्तउत्तानासन, हस्तपादासन, एकहस्त कटीचक्रासन, अर्धचक्रासन, वज्रासन , शशांकासन, अद्वासन, तिर्थक भुजंगासन, सरल मत्स्यासन, शवासन, प्रणायामात- सूर्यानुलोम-विलोम , सुर्यभेदन, भस्रिका, उज्जयी प्राणायाम, दीर्घश्वसन, जलनेती, तसेच इतर शरीर शुद्धिक्रिया इत्यादि कृति करुन दाखवून करून घेण्यात आले.
या शिबिरात राज्याच्या विविध भागांतून वेगवेगळ्या क्षेत्रांतील योग साधकांनी सहभाग घेतला. मंथन निरामय योगप्रसार केंद्राच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग आसने, प्रणायम करण्याचा सराव केला.
कोविड विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास मदत व्हावी यासाठी योगशिबीराचे आयोजन मंथन निरामयचे विद्यार्थी-योगशिक्षक उद्योजक पंकज काशिनाथ महाळुंगकर (शिवबा इंडस्ट्री), प्रोफेसर सिमा पंकज महाळुंगकर, मोहिनी सोमनाथ आवटे, प्रिया दत्तात्रय महाळुंगकर व ललिता विकास महाळुंगकर यांनी केले.
या ऑनलाईन योग शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ज्योती पानसंबळ, शासकीय अधिकारी शुभांगी माने मॅम, देहूगावचे आदर्श उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे, म्हाळुंगे गावचे ग्रामविकास अधिकारी परासुर भाऊसाहेब, विजयानंद आवटे ( मा.तंटामुक्ती अध्यक्ष, शेलपिंपळगाव) आदी मान्यवर उपस्थित होते.
मंथन निरामयच्या केंद्रप्रमुख विद्या आहेरकर, संचालिका आशा भट्ट, राम काकडे, डॉ.सतीश बापट, सविता स्वामी, रविना कुलकर्णी, आरती मनूरकर, डॉ. नीता पद्मावत, डॉ. अर्चना मुदखेडकर , डॉ.मिनाक्षी रेड्डी, पल्लवी चौधरी, शीतल साडेगावकर आदी योगशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.










Leave a Reply