Pimpri News: एमआयडीसीचा शहरातील ‘या’ भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद
Pckhabar-राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पावसाळा पूर्वीचे देखभाल व दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी (दि.27) करण्यात येणार आहे. त्यामुळे एमआयडीसी पाणीपुरवठा करत असलेल्या भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती एमआयडीसीचे उपअभियंता कल्पेश लहिवाल यांनी दिली.
एमआयडीसीकडून होणा-या पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शुक्रवारी (दि.28) पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीचे उपअभियंता कल्पेश लहिवाल यांनी केले आहे.










Leave a Reply