Pimpri Corona news: कोरोनाचे 590 नवे रूग्ण, 40 जणांचा मृत्यू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या हजाराच्या आत आली आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. तर मंगळवारी 590 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 869 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 40 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 47 हजार 722 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 37 हजार 846 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात महापालिका हद्दीत 26 तर हद्दीबाहेरील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 5 हजार 464 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 124 घरांना भेटी देऊन 7 हजार 761 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
शहरात मेजर कन्टेंन्मेंट 182 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 594 करण्यात आले आहेत. शहरात 4 लाख 80 हजार 327 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply