Talegaon news: मायमर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; अनेक मागण्या मान्य
Pckhabar-तळेगाव दाभाडे शहरातील मायमर हॉस्पिटलमधील तृतीय व चतुर्थ श्रेणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप मागे घेतला आहे. मायमर हॉस्पिटल व्यवस्थापन, कर्मचारी प्रतिनिधी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
न्याय व हक्कांसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सहभाग घेतला होता.
मायमर हॉस्पिटलच्या आश्वासनानंतर कर्मचारी बंधू-भगिनी हा संप तात्काळ मागे घेतला. कोरोना काळात हे कोरोना योद्धे आपल्या जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या हक्कासाठी त्यांच्यासोबत उभं राहणं, त्यांना न्याय मिळवून देणं हे आमची प्रामाणिक जबाबदारी आहे. त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असल्या तरी अनेक मागण्या मान्य झालेल्या नाहीत. तरीही या कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य ओळखून सर्वसामान्यांना आवश्यक आरोग्य सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी दोन पावले मागे येत त्वरित सर्वजण कामावर रुजू झाले. त्या सर्व बंधू-भगिनींचे मनापासून आभार आमदार शेळके यांनी मानले.
“कोरोनाच्या संकट समयी रुग्णसेवेचा हा वसा कायम ठेवत आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. पुढील काळात देखील आपल्यासोबत मी ठामपणे उभा राहील. आपणां सर्वांना आपले हक्क व न्याय मिळवून देण्याची प्रामाणिक भूमिका ठेवुनच काम करील, असा विश्वास आमदार शेळके यांनी दिला.”










Leave a Reply