Nigdi crime news: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी चोरीचा प्रयत्न; वडिलांना चोरट्याने मारला चाकू
Pckhabar-मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या निगडी, प्राधिकरणातील निवासस्थानी आज (मंगळवारी) सकाळी चोरीचा प्रयन्त झाला. सकाळी साडेसात वाजता चाकू, प्लास्टिकचे पिस्तुल घेऊन चोरटा घरात घुसला होता. सोनालीच्या वडिलांची आणि चोरट्याची धरपकड झाली. चोरट्याने चाकू त्यांच्या हातावर मारला. त्यात सोनालीच्या वडिलांना लागले आहे. चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
निगडी, प्राधिकरणात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे निवास्थान आहे. तिचे आई वडील तिथे राहतात. आज सकाळी एक चोरटा चाकू, प्लास्टिकचे पिस्तुल घेऊन घरात घुसला. त्याला सोनालीच्या वडिलांनी पाहिले. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने चाकू मारला. तिच्या वडिलांच्या हाताला मार लागला आहे.
सुरक्षा रक्षकाने पोलिसांना माहिती दिली. स्थानिक नगरसेवक अमित गावडे, निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत. दरम्यान, सकाळी साडेसात चोरटा घरात घुसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.










Leave a Reply