Maval news: कोविड सेंटरच्या परिसरात आयुर्वेदिक झाडाचे वृक्षारोपण

Maval news: कोविड सेंटरच्या परिसरात आयुर्वेदिक झाडाचे वृक्षारोपण

Pckhabar-आमदार सुनिल शेळके यांच्या संकल्पनेतून मावळ तालुक्यातील पणन मंडळ येथील कोविड केअर सेंटर येथे आयुर्वेदिक झाडाचे वृक्षारोपण रुग्णांच्या हस्ते करण्यात आले.

रुग्णांचे मनोबल उंचावण्याच्या दृष्टीने आणि विरंगुळा म्हणून अनोखे उपक्रम आमदार सुनिल अण्णा शेळके युवा मंच व विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीने तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये घेण्यात येतात.

कोरोना महामारीत ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजनचे महत्व पटवून देण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून प्रत्येक रुग्णाच्या हस्ते एक आयुर्वेदिक झाड लावण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *