Pimpri Corona news: खुशखबर, कोरोना रूग्ण संख्या पाचशेच्या आत  

Pimpri Corona news: खुशखबर, कोरोना रूग्ण संख्या पाचशेच्या आत
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या पाचशेच्या आत आली आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.

सोमवारी 423 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 626 जणांना घरी सोडण्यात आले आहे.  39 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 47 हजार 132 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 36 हजार 974 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 24 तर हद्दीबाहेरील 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 हजार 118 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 973 घरांना भेटी देऊन 7 हजार  704 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

शहरात मेजर कन्टेंन्मेंट 182  असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 594 करण्यात आले आहेत. शहरात 4 लाख 79 हजार 470 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन महिन्यात नंतर कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरात सुमारे साडेसहा हजार कोरोना बेड शिल्लक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *