Pimpri Corona news: कोरोनाचे 750 नवे रूग्ण, 45 जणांचा मृत्यू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या एक हजाराच्या आत आली आहे. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. महापालिका हद्दीत शुक्रवारी 750 नवे रूग्ण आढळले आहेत. 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 520 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 45 हजार 413 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 29 हजार 18 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात महापालिका हद्दीत 30 तर हद्दीबाहेरील 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 हजार 102 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 152 घरांना भेटी देऊन 7 हजार 589व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 229 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 549 करण्यात आले आहेत. शहरात 4 लाख 72 हजार 122 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply