Pimpri Corona news: कोरोनाचे 716 नवे रूग्ण, 46 जणांचा मृत्यू  

Pimpri Corona news: कोरोनाचे 716 नवे रूग्ण, 46 जणांचा मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या एक हजाराच्या आत आली आहे. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. महापालिका हद्दीत गुरूवारी 716 नवे रूग्ण आढळले आहेत. 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 99 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 44 हजार 663 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 27 हजार 498 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 29 तर हद्दीबाहेरील 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 6 हजार 455 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 254 घरांना भेटी देऊन 7 हजार 883 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 227 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 848 करण्यात आले आहेत. शहरात 4 लाख 70 हजार 942 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *