Pimpri Corona news: कोरोनाचे 762 नवे रूग्ण, 58 जणांचा मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या एक हजाराच्या आत आली आहे. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. महापालिका हद्दीत बुधवारी 762 नवे रूग्ण आढळले आहेत. 58 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 980 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 43 हजार 947 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 26 हजार 399 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात महापालिका हद्दीत 42 तर हद्दीबाहेरील 16 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 हजार 218 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले.
2 हजार 440 घरांना भेटी देऊन 8 हजार 810 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 232 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 840 करण्यात आले आहेत. शहरात 4 लाख 70 हजार 942 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply