Pune news: राहुल गांधींचे विश्वासू सहकारी खासदार राजीव सातव यांचे निधन
Pckhabar- काँग्रेसचे पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी खासदार ॲड. राजीव सातव यांचे कोरोनामुळे आज सकाळी (रविवार) निधन झाले. त्यांना प्रकृती पुन्हा एकदा गंभीर झाल्याने शनिवारी पहाटे पासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पुण्यातच जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.मागील काही दिवसांपूर्वी राजीव सातव यांनी कोरोनावर मात केली होती. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना इतर आजारांनी ग्रासलं होतं. शनिवारी त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काँग्रेसचे खासदार ॲड. राजीव सातव पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल येथे कोविडवर उपचार घेत होते. 23एप्रिल रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. तातडीने गरज भासल्यास इक्मो मशीन देखील उपलब्ध करण्यात आली होती.
मुंबईल येथील डॉ. राहुल पंडित, डॉ. शशांक जोशी यांच्या पथकाने पुणे येथे येऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गेल्या 22 दिवसांपासूनची सातव यांची झुंज संपली आहे.
एक युवा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने राजकीय, सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.










Leave a Reply