Delhi News : मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल
Pckhabar- मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर गुरुवारी केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करण्यात आली. यामध्ये आरक्षण देण्याचे अधिकार राज्यालाच आहे असे स्पष्टपणे सांगण्यात आले.
या याचिकेचा निर्णय लवकर जर लागला आणि सर्वोच्च न्यायालयाने हे अधिकार राज्यालाच आहे असे स्पष्ट केले तर याचा निश्चित मराठा समाजाला फायदा होईल. आता राज्य सरकारने देखील आपले म्हणणे न्यायालयात दाखल करणे गरजेचे आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेटही घेतली होती. तसेच मराठा आरक्षणासाठी राष्ट्रपती आणि मोदी सरकारला त्यांनी पत्रही लिहिलं होतं. तसेच गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं.
मराठा समाजाने आरक्षणासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून आंदोलन करण्यास सुरुवात केली होती.










Leave a Reply