Delhi News : कोविशिल्ड (Covishiled)लसीचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी वाढविला

Pckhabar- कोरोना लशीचे (Corona vaccine) दोन डोस घेणं अनिवार्य आहेत. कोरोनाच्या दोन डोसमध्ये (gap between the first and second doses) किमान 28 दिवसांचं म्हणजे 4 आठवड्यांचं अंतर असतं. पण आता हे अंतर वाढवण्यात आलं आहे. आता कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 4 नाही तर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत तुम्हाला कोरोना लशीचा दुसरा डोस घेता येईल. पण हा नियम फक्त कोविशिल्ड (Covishiled) कोरोना लशीसाठीच लागू असेल.
सीरम इ्नस्टि्यूटच्या कोविशिल्ड कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवावं अशी शिफारस सरकारच्या नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोव्हिड 19 (NEGVAC) या समितीने केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शिफारस मान्य केली आहे नुसार कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांनी वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आलं आहे. याचा अर्थ पहिला डोस घेतल्यानंतर एका महिन्याने नव्हे तर 3 ते 4 महिन्यांदरम्यान तुम्ही कधीही दुसरा डोस घेऊ शकता.










Leave a Reply