Maharashtra News :  राज्यात 1 जूनपर्यंत लाॅकडाऊन वाढवला

Maharashtra News :  राज्यात 1 जूनपर्यंत लाॅकडाऊन वाढवला
Pckhabar- कोरोनाचा वेग मंदावला असला तरी धोका कायम आहे. त्यामुळे ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध 15 मे पर्यंतचे सर्व नियम 1 जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची नियामवली राज्य सरकारने जाहीर केली आहे.

राज्यातील काही महत्त्वाच्या शहरातील रुग्ण संख्या कमी होत असली तरी ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा 15 दिवसांचा लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या काळात दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे, तसंच घरपोच सेवा विक्री यासाठीही परवानगी कायम आहे.

त्याचबरोबर इतर राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी 48 तास आधी कोरोनाची आरटीपीसीआरटी टेस्ट गरजेची आहे. परराज्यातून माल वाहतूक करणारे गाड्यांमध्ये आता दोन जणांना प्रवास मुभा असेल. त्यासाठी देखील आरटीपीसीआर टेस्ट गरजेची असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *